तुहीन Australiaला गेल्यापासून मी हिंदी चित्रपटसंगीत मध्ये काय ऐकवे आणि काय नही हयात बरीच मदत करतो. त्याला बर्याचदा सांगूनही त्याने दिल्ली6 ची गाणी ऐकली नव्हती.
रेहमान आणि प्रसून जोशीचे मस्त समीकरण जुळले आहे आणि ते खुपदा R.D. आणि गुलझार ची आठवण करून देतात. सध्या आम्हा दोघांनाही "रेहना तू " गाण्याने sollid भांडावून सोडले आहे. त्याचा स्वैर अनुवाद करण्याचे डोक्यात आले.
तू मात्र रहा
जशीच्या तशी
थोडेसे दु:ख
तर कधी खुशी
(Rehna Tu
Hai Jaisa TU
Thoda sa dard tu
Thoda Sukun)
तू मात्र रहा
जशीच्या तशी
हवेची मंद झुळुक
तर झूंझार कधी
(Rehna Tu
Hai Jaisa TU
Dheema Dheema jhonka
Ya phir junoon)
तू रेशमी
तू हविहवीशी
रखरखीत कधी
तर अल्लड कधी
तू तर भांडखोर
परिमळ तुझा दरवळतो चौखेर
(Thoda sa resham
Tu humdam
Thoda sa khurdura
Kabhi daud jaye
Ya lad jaye
Ya khushboo se bhara)
तू बदलू नकोस किंचिताही
ना उद्या ना आज
अशीच सदैव रहा
निर्लेप अन निर्व्याज
(Tujhe badalna na chahoon
Rati bhar bhi sanam
Bina sajawat milawat
Na jyaada na hi kaam)
तू दिलेल्या घावांवर
मलम पण तूच आणून दिलेले
त्या जखमे वर देखील मी जीव ओवाळुन टाकतो
ह्या अथांग सागारात मी खोल बुडून जातो
(Tu zakham de agar
Marham bhi aakar tu lagaaye
Zakham mein bhi mujhko pyaar aaye
Dariya o dariya
Doopne de mujhe dariya
Doopne de mujhe dariya)
तू मात्र रहा
जशीच्या तशी
थोडेसे दु:ख
तर कधी खुशी
तू मात्र रहा
जशीच्या तशी
हवेची मंद झुळुक
तर झूंझार कधी
एकसाथ चालताना हात
आपले दूर का म्हणून?
चल जाउ दूर वर
एकमेकानांच्या हातात हात मिसळून
(Haath tham chalna hi
To dono ke daye haath sang kaise
Haath tham chalna hi
To dono ke daye haath sang kaise
Ek daaya hoga ek baaiya hoga
Tham le haath yeh thaam le
Chalna hai sang tham le)
कधीकाळी डायरीमध्ये काहीतरी लिहिलेले किंवा उगाच डोक्यात काही चमकलेले असेच काहीसे- असेच काहीतरी
Wednesday, 6 May 2009
Tuesday, 14 April 2009
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
माझ्या परंपरागत इंग्लीश ब्लॉग्सना काट्शह देऊन हा पोस्ट मराठी मधून लिहितोय. आता इथे काही ठिकाणी माझी मराठी शब्द संपदा खूप तोकडी पडते, एकतर ब्लॉग, पोस्ट ह्याना मराठी प्रतिशब्द काय? दुसरे म्हणजे मराठी मध्ये टाइप\एडिटिंग करणे म्हणजे भारी वैताग.
असो, तर ह्या गुड फ्रायडेच्या दीर्घ वीकेंड्ला "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" बघायचा असा पण करूनच मी मुंबईकडे कूच केले. एकतर चित्रपटाला मिळालेली प्रसिद्धीमुळे त्या बद्दलची उत्कंठा आणि अपेक्षा दोन्ही शिगेला पोहोचलेल्या. घरी येऊन बघतो तर मुंबई मध्ये चक्क 50 हून अधिक सिनिमा गृहामध्ये हा चित्रपट झळकलेला, बहुतेक इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबई मध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ, खारघर मध्ये नव्यानेच 'बिग सिनिमा' उघडलेला त्याचे उद्घाटन करायला ह्याहून योग्य चित्रपट नव्हता"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" गोष्ट आहे दिनकर भोसलेची (सचिन खेडेकर) मध्य-मुंबईच्या आपल्या वाडीलोपरजित बंगल्यात दोन पोट भाडेकरू सोबत राहणारे (अनुक्रमे एक मुस्लिम आणि एक उत्तर भारतीय) D. M. भोसलेनचे चौकोनी कुटुंब, मुंबईतल्या कुठल्याही सर्व सामान्य मध्यम वर्गीयासारखेच त्यांचे प्रश्न, समस्या.
आपल्या बँकेतल्या तुट्पुन्ज्या पगारावर घर चालवताना होणारी कुचंबणा , रोज रोज त्याच त्याच भाज्या (खासकरून बॉम्बिल\मांडेली)खाऊन वैतागलेल्या सौभाग्यवती भोसले (सूचित्रा बांदेकर) निव्वळ अर्धा टक्का कमी पडला म्हणून इंजिनियरिंग न करू शकणारा आणि पैसे चारून प्रवेश घेण्यात असमर्थ असलेला जूनियर भोसले (अभिजीत केळकर) आणि फक्त मराठी आहे म्हणून हिंदी चित्रपटाच्या ऑडिशन्स मधून बाहेर काढली गेलेली शशिकला भोसले (प्रिया बापट). चित्रपटाचा पुर्वार्ध ह्या सगळ्या व्यक्तीरेखा नीट रेखाटण्यात जातो.
चित्रपटातले कित्येक प्रसंग थेट आपल्याच आयुष्यातून चोरून नेल्यासारखे वाटतात आणि नकळतच आपण D. M. भोसलेच्या आयुष्यात गुन्तत जातो. त्यांची घालमेल तगमग मनाला पटते आणि टोचत राहते.त्यातच भोसलेच्या गोजिरवाण्या (??) बंगल्या वर एका मोठ्या बिल्डरची (विध्याधर जोशी) नजर पडते मध्य- मुंबईतल्या बंगल्याच्याजागी एक टोलेजंग टॉवर बांधून भोसले कुटुंबाची रवानगी बदलापूरला करण्याचा बिल्डरचा प्लान असतो. मोठे घर, सन्त्रो गाडी अश्या आमिषने सौ. भोसले लगेच राजी होतात पण नेमका श्रियुत भोसलेनचा मराठी बाणा आडवा येतो. रोजच्या जीवानातले अपमान झेलत असतानाही भोसले आपला बाणा आणि कणा टिकवून ठेवायचा कसोशीने प्रयत्न करतात. पण एका कमजोर क्षणी त्यांच्या सबूरीचा बांध मोडून पडतो.अगतिक आणि पराजित भोसले समस्त मराठी पूर्वजांवर् तुटून पडतात आणि आपणास मराठी असल्याची शरम वाटते , ह्या देशात महाराष्ट्रीय असणे पाप आहे असे बोलतात. भोसलेनचे हे स्वगत थेट रायगडावरच्या शिवबाला ऐकायला जाते. आणि भोसलेना धडा शिकवायला शिवबा (महेश मांजरेकर) आणि रायबा (मकरंद अनासपुरे) मुंबईकडे कूच करतात. मराठी\महाराष्टीय असण्याचा अर्थ आणि सामर्थ्य काय हे समजावून शिवबा आपली भवानी तलवार भोसल्यांच्या हवाली करतात. इथून पुढे सुरू होतो भोसलेनचा लढा (आणि त्याच बरोबर चित्रपटाची घसरण).
भोसल्यांसाठी पुढची वाटचाल खूप कठीण असते रस्त्यात अनेक अडचणी येतात, मुलाचा अपघात, भ|डोत्री हल्लेखोर, अनेक धमक्या पण भोसले लोकाना (पक्षी प्रेक्षकाना )भाषणे देत देत, भरपूर टाळ्या आणि शिट्ट्या मिळवत खिंड लढवत राहतात.
"मी शिवाजीराजे ..." एक अत्यंत सफाईदार व्यावसायिक चित्रपट आहे , निवडणुकीची वेळ, मराठी चित्रपटांचा वाढत चाललेला दबदबा, मराठी वि. अमराठी विवाद असे अनेक पैलू हा चित्रपट आरामात स्पर्श करतो. चित्रपटाच्या खूप जमेच्या बाजू आहेत तेवढाच तो काही बाबतीत तोकडा देखील पडतो.
जमेच्या बाजू: सहज सुंदर अभिनय, चित्रपटात सगळ्याच अभिनेत्यानी केलेला सहज अभिनय, सिद्धार्थ जाधवची निवड त्याच्या लोकप्रिएतेवर डोळा ठेवून केलेली वाटते आणि अपवाद महेश मांजरेकरने साकारलेला शिवबा फारच वयस्कर आणि काहीसा आजारी वाटला
संवाद, हमखास टाळ्या नाहीतर शिट्ट्या मिळवणारे संवाद, खासकरून भोसलेची भाषण बाजी चालू असताना, पण ते कुठेही रटाळ वाटत नाही (आणि थोडीशी नानाच्या क्रांतीवीर ची आठवण पण करून देतात)सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट कुठेही मराठी वि. उत्तर भारतीय वादावरची खपली काढत नाही, उलतपक्षी मराठी\महाराष्ट्रीयांच्या आजच्या परिस्थितीला बाव्हतांशी ते स्वत: जबाबदार आहेत असा मुद्दा मांडतो.
मग घोड आडते कुठे?....हा चित्रपट खूप बोलतो (खूप म्हणजे खुपच जास्त), चित्रपट बनवतानाच "बघा, कसा तुमच्यातला मराठी बाणा जागवतो "असा हेतू बाळगलेला दिसतो तसेच पूर्वार्धातील काही प्रसंगात खूप अतिशयोक्ती पण वाटली. पण तरीही ते कुठे खटकत नाही कारण सबंध चित्रपट आपल्यातल्या मराठी\महाराष्ट्रीयात्वाला गोंजारत राहतो, फक्त राहून राहून वाटते की थोडी मनोज कुमारगिरी कमी हवी होती.
तरीही "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" एक फर्मास चित्रपटनुभव देऊन जातो. 3 करोडहून जास्त बजेटमध्ये बनवलेला आणि खूप सार्या मोठ्या कलावंताना छोट्या छोट्या भूमिकेत घेऊन चित्रपट आपली स्टार वॅल्यू वाढवतो.उत्तम निर्मितिमुल्य, झक्कास संगीत आणि एकंदरीत प्रामाणिक प्रयत्नाचे श्रेय महेश मांजरेक्रला द्यायलाच हवेय. तुमच्यातला अभिमान जागो ना जागो, पण हा चित्रपट एकदा बघायला काहीच हरकत नाही.
Subscribe to:
Comments (Atom)